नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ उत्तम राहते, अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे करा हो नियमित योगासन हे गीत म्हणत शनिवारी सकाळी आठ वाजता च्या दरम्यान हजारो योग साधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाचे. एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडियम येथे आज पार पडला.