लोणार तालुक्यातील महारचिकना येथील 22 वर्षीय विवाहित युवती 2 सप्टेंबर रोजी हरविल्याची नोंद बिबी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.महारचिकना येथील सौ पल्लवी वैभव मुंडे ही 22 वर्षीय विवाहित युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद बिबी पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.