शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व त्यांच्या लोकदरबार कार्यक्रमाच्या निषेधार्थ विरार येथे आंदोलन करण्यात आले. अडचणीच्या काळात कोणीही वसई विरारकडे पाहत नाही मात्र निवडणुका आल्यानंतर मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत याच्या निषेधार्थ परिवहन मंत्री व त्यांनी आयोजित केलेल्या लोक दरबार कार्यक्रमाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी हाताला काळ्याफिती बांधून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.