पाथर्डी तालुक्यातील सर्व गणेशोत्सवाच्या मिरवणुका पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहात पार पडल्या. डीजे मुक्त गणेशोत्सवाची सुरुवात पाथर्डी तालुक्यातून झाली या काळात एकही डीजे वाजला नाही ही अत्यंत अभिमानास्पद आणि इतरांना दिशा देणारी बाब आहे हा डीजे मुक्त गणेशोत्सव राज्यासाठी पथदर्शक ठरेल असं प्रतिपादन अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केलं. पाथर्डी पोलिस ठाण्याच्या वतीने या वर्षी गणेशोत्सव काळामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मंडळांना विविध पारितोषिके देण्यात आली.