इंजोरी येथून जवळच असलेल्या धामणी फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन एक जण जखमी झाल्याची घटना दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. सदर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीची माहिती सतीश गावंडे यांनी सास कंट्रोल रूम इंजोरीचे अजय ढोक यांना दिल्यानंतर त्यांनी अजय घोडेस्वार यांना तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पाठवून जखमी रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.