बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे .जो शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष स्थान असतो. हा सण मुख्यतः शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या बैलांशी संबंधित आहे.शेतात राबणाऱ्या बैलांना आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.त्यानिमित्य आज दिनांक 22 ऑगस्ट ला धनज येथे पोळा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपापल्या बैल जोडीना चांगल्या प्रकारे सजवून पोळ्यामध्ये आणले होते. सायंकाळच्या सुमारास भरलेला बैलपोळा बघण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली...