धुळे येथे जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत उभे असलेले अमोल रमेश बावस्कर (वय ४३, रा. पहूर, ता. जामनेर) यांना कारमध्ये बसवून वादाचा बनाव करीत त्यांच्या खिशातून रोख २२ हजार ५०० रुपये व मोबाईल काढून घेतला. हा प्रकार २५ ऑगस्ट रोजी अजिंठा चौफुली परिसरात घडला. या प्रकरणी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.