दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम सालईटोला येथे झालेल्या अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री १०:१५ वाजता घडली. सुरेंद्र राजू मरस्कोल्हे (२०, रा. सालईटोला जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे.अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दवनीवाडा पोलिस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केल