पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळात “सबका साथ, सबका विकास” या घोषणेसोबत देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा झाली आणि गेल्या आठ वर्षांत अनेकांनी घर मिळण्याच्या आशेने प्रतीक्षा केली. मात्र यवतमाळ शहरात आठ ते नऊ वर्षांपासून बेघर नागरिकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही असा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.