मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमध्ये 'पात्र' हा शब्द गायब केलेला आहे. हा शब्द गायब करणाऱ्यावरती कारवाई व्हावी, नसेल तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्लेषण द्यावं, अशी मागणी ओबीसी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुदर्शन घेरडे यांनी केली. त्यांनी सांगोला तहसील कार्यालय या ठिकाणी ४ सप्टेंबर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास याबाबतचे निवेदन सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांना दिले आहे.