वर्ध्यातील बोरगावात नुकतीच दुर्दैवी घटना घडली..अशोकराव मोहदुरे यांचा चार वर्षांचा नातू श्रेयांश पंकज मोहदुरे, हा नालीजवळ खेळत होता. त्यावेळी अचानक पाऊस वाढला आणि नाल्याला आलेल्या पुरामुळे त्याला वाहून नेले. ही घटना लक्षात आल्यावर लगेचच शोधाशोध सुरू झाली. खूप शोधल्यानंतर, चितोडा गावाजवळील नाल्याच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता समोर आला आहे