निमगाव येथील पाटबंधारे विभाग गोंदिया मामा तलावाच्या मध्यभागी असलेल्या ६० हेक्टर क्षेत्राच्या तलावाच्या बांधावर अचानक भगदाड पडल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.भगदाड पडल्यामुळे तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तातडीने प्लास्टिक व माती टाकून भगदाड तात्पुरते बंद करण्याच्या काम पाटबंधारे विभाग, गावकरी मंडळी व मच्छीमार संस्थेच्या वतीने सुरू आहे.