देवळी-पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी नुकतीच मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बंद पडलेली पुलगाव कॉटन मिल (सध्या जयभारत टेक्स्टाईल्स) पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली. या मागणीमुळे 2001 साली काँग्रेस सरकारने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांची पुन्हा चर्चा सुरू झाली असल्याचे आज 29 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे