बंदी कायदा झुगारून परराज्यांतील अनेक मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसत असून मालवण सह कोकण हद्दीत अक्षरश: धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात मासळी लुटून नेत आहेत. तरी मत्स्य विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पर्ससीन नेट फिशिंग असोसिएशन संचालक रमेश नाखवा यांनी आज शनिवार ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे.