आताही मला सरकारने गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे. मी मरण पत्करायला तयार आहे, पण मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणाला आज सकाळी साडे दहा वाजता सुरवात केली. सातत्याने 48 तास प्रवास करून अखेर मनोज जरांगे पाटील आज सकाळीन मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले.