सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अतिरिक्त मोबदला वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करणार असल्याचे सांगितले. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे भूसंपादन सुरू असताना त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर हे भूसंपादन अधिकारी होते. त्यांच्या कार्यकाळात सुमारे 140 कोटीचा जादा मोबदला वाटप झाल्याचे सिद्ध झाले आहे.