यवतमाळ शहरातील स्थानिक संविधान चौकात दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात विविध पक्ष व संघटनांचा सक्रिय सहभाग दिसून आला. या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोर इंगळे यांनी संयुक्तपणे आपले विचार व्यक्त केले व आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.