एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आणि शेतकऱ्याचा सोबती असलेल्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असताना, धुळे तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतकरी कुटुंबावर याच सणाच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विलास संतोष धनगर या शेतकऱ्याच्या बैलाचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.