राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये एसटी प्रवर्गांत समाविष्ट करण्याची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पुन्हा एकदा जोरदार स्वरूपामध्ये समोर आली आहे. या मागणीसाठी सकल बंजारा समाजान पाथर्डीमध्ये भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. समाजातील पुरुष, युवक, वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आम्हाला न्याय द्या, आमचे हक्क मिळालेच पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.मोर्चच्या सुरुवातीला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि छत्रपती