आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी कोलाड येथील श्री अंबरसावत महाराजांच्या मंदिराला भेट दिली. यावेळी सार्वजनिक श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि बाप्पाच्या आरतीत सहभागी होऊन भक्तिभावाने आराधना केली. सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी निरंतर अबाधित राहो, अशी खासदार सुनील तटकरे यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.