तालुक्यातील पाचपीरवाडी येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी साडेचार वाजता देशी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात चत्तरसिंग रामसिंग बहुरे (वय ४९, रा. पाचपीरवाडी) याच्या ताब्यातून ७२० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी आरोपी बहुरेविरोधात शिल्लेगाव पोलिसांत रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.