शहरातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक हे या उत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण. यंदाची मिरवणूक वेळेत पार पडण्यासाठी पोलिसांकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मानाच्या गणपती मंडळांसह इतर प्रमुख मंडळांसाठी विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक देण्यात आले आहे.