मनपाच्या कार्यवाईमुळे परिवहन महामंडळ सक्रिय झाले असून शहगंज येथील खाली बस डेपोवर साचत असलेल्या कचराबाबत मनपाच्या पत्रानंतर परिवहन महामंडळाने पत्रे लावले असल्याची माहिती महानगर पालिकेच्या वतीने १९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दिली. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहगंज येथील जुन्या बस डेपोवर साचत असलेल्या कचराबाबत कार्यवाई नंतर आता तिथे राज्य परिवहन महामंडळाकडून पत्रे लावून खाली जागा संरक्षित करण्यात आली आहे.