संगमनेर तालुक्यात विविध विकासकामांसाठी ३.५ कोटींचा निधी मंजूर संगमनेर तालुका विकासाचे आदर्श मॉडेल ठरत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते व क-वर्ग तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, जनसुविधा, क-वर्ग तीर्थक्षेत्र विकास व नागरी सुविधा योजनेतून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.