धुळे तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्याजवळ २५ ऑगस्ट रोजी रात्री धावत्या कंटेनरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून तीस टन पीठ जळून खाक झाले. भीषण आगीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. माहिती मिळताच सोनगीर पोलीस, टोल प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.