घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन येत असलेल्या हद्दीत एका आश्रम शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला.पीडित मुलीने व्हिडिओ तयार करून केलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या प्रकाराचा भंडाफोड झाला. यानंतर कंत्राटी शारीरिक शिक्षण शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला असल्याचे समोर आले.या प्रकरणात आरोपी शिक्षक दीपक पीसे याला अटक करण्यात आली. आरोपी शिक्षक हा व्यायामाचा बहाना करून लज्जास्पद पद्धतीने विद्यार्थ्यांना लावत होता.