Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 7, 2025
आज दि 7 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य व केंद्र सरकारवर शेतकऱ्यांविषयी अन्याय केल्याचा आरोप केला. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना, सरकार पंचनामे आणि जीआरच्या घोळात मदत टाळत असल्याचे त्यांनी म्हटले. पवार यांनी सांगितले की 2022 मध्ये मिळणारी हेक्टरी 13,600 रुपयांची मदत सरकारने कपात करून 8,500 केली असून, त्यातीलही अनेक शेतकऱ्यांना पैसे