राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागातील विविध बांधकामांशी संबंधित 89 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण केल्यावर ही शासनाकडून कंत्राट दारांना देयक दिले जात नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून सांगलीतील एका कंत्राटदाराने काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. आता नागपुरातही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी एका कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पी व्ही वर्मा उर्फ मुन्ना वर्मा असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे.