जिल्ह्यात एकही पुढारी असा दाखवून द्या ज्यांनी लोकहिताच्या योजना आतापर्यंत स्वतःहून आणून दिले आहेत.. जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना देण्याचा काम केले नाही परंतु नेहमीच आम्ही नागरिकांसाठी राबवित असलेल्या लोकहित्याच्या योजनांना तक्रारी करून बंद पाडण्याचे काम विरोधकांनी केले आहे. असा आरोप राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी भालेर गावात केला.