महानुभाव संप्रदायाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.