राहुरी शहरात गणपती उत्सव मोठ्या थाटात साजरा साजरा होत असताना रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे असल्याने विसर्जन मिरवणुकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये भाजप तालुका अध्यक्ष विक्रम भुजाडे यांनी खड्डे बुजवण्याची मागणी नगरपालिकेकडे केली होती त्यानंतर नगरपालिकेने सदर अर्जाची दखल घेत विसर्जनापूर्वी शहरांतर्गत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.