मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन आज गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाची सुरुवात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी पोहोचेल आणि गावोगावी विकासाची नवी उर्जा मिळेल असे प्रतिपादन केले.