मळगांव येथील एका गृह निर्माण प्रकल्पाच्या घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगांव ग्रामपंचायत प्रभारी ग्राम विकास अधिकारी ज्ञानदेव सीतराम चव्हाण वय ५२, रा. कणकवली याला आज शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सावंतवाडी शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.