जतेत गणेशोत्सव काळात व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने वर्गणी उकळण्याचे प्रकार वाढीस लागले असल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. व्यापाऱ्यांच्या या बंद आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठ संपूर्ण ठप्प राहिली. आंदोलनावेळी व्यापारी असोसिएशनचे बिजरगी, आरपीआयचे संजय कांबळे तसेच विविध व्यापारी, स्थानिक नेते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित