Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
जातेगावपासून येथील पिनाकेश्वर महादेव घाटातील दरीत ट्रॅक्टर ट्रॉली कोसळून यापूर्वी कांताबाई नारायण गायके वय (५६) रा.खामगाव ता.कन्नड व कमलबाई शामराव जगदाळे वय (६२) रा.जानेफळ ता.वैजापूर या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला होता .याच अपघात भक्ती आप्पासाहेब राऊत वय १४ रा.खामगांव ता.कन्नड ही गंभीर जखमी होती. हीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज बुधवारी दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अपयशी ठरली.