गडचिरोली : पुन्हा एकदा अडेंगे–नेडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला फसली. प्रवासी घाबरून गेले, मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला. हा प्रकार नवीन नाहि. सुरजागड– गट्टा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज काढण्यासाठी सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना वेळ मिळतो, पण स्थानिक जनतेच्या जीवाचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने काहीच नाही.