जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या गर्भवती विवाहितेने आपल्या आई-वडिलांच्या घरी सासरच्या जाचाला कंटाळून सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती या संदर्भात चौकशी अंती अखेर शनिवारी २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पतीसह सासरच्या मंडळी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.