बाहेरील जिल्ह्यातून येऊन गाडी भाडे मारतोस काय? तीन हजार रुपये हप्ता महिन्याला हप्ता देत नाही, असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दोघांना लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कडाचीवाडी (ता. खेड) येथे घडला. याप्रकरणी महेश कड (रा. कडाचीवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.