हिंगणघाटः वर्धा जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या वतीने शहरातील येथील मोहता भवनात दोन दिवसीय राष्ट्रीय स्विस पेअर ब्रिज स्पर्धा भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तीनशे अधिक नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला असून, स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या स्पर्धेचे आयोजन 'गिमा टेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड' या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले असून, स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आणि विदर्भातील सर्व येणारे खिलाडी यांचे स्वागत करण्यात आले.