खासदार प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय,पाल चौक गोंदिया येथे गोरेगांव शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा वापरून गोरेगाव शहरातील कैलास वाघाडे,विलास वाघाडे,देवेंद्र वाघाडे,राजेश येल्ले,मारुती उके,रोहित उके,तेजराम मौजे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.