जालना शहरातील मोती तलावात तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती बसविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. यासंदर्भात समाजसेवक अमित सुनील साळवे यांनी महानगरपालिका आयुक्तांना गुरुवार दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता निवेदन सादर केले असून, 17 सप्टेंबर 2025 रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जालना शहर हे औद्योगिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत असून आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मोती तलावात तथागत गौतम बुद्धांचा पुतळा उभारला जावा.