स्वर्गीय मीना ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ह्यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन केले. ह्यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते विजय कदम, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.