पावसाळा लागला तरीही कामठी शहरात समस्यांचा डोंगर आहे त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहे. यादरम्यान महिलांनी तर चक्क उपोषणाचा इशारा देखील स्थानीय प्रशासनाला दिला आहे. येथे गटाराची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी कचरा आणि खड्ड्याची समस्या तर कायमच आहे. अशातच महिलांनी प्रतिक्रिया देताना तात्काळ या समस्या सोडविल्या नाही तर उपोषणाची तयारी दर्शविली आहे.