शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथील वीर जवान दिनेश तुफान पावरा यांच्या पार्थिवावर 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या दिनेशच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.पोलिस व लष्कराच्या जवानांकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.