उदगीर शहरातील आली नगर येथे एकाचा खून झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री घडली आहे, या घटनेतील दोघां आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, उदगीर शहरातील नेत्रगावं रोडवर एक व्यक्ती मृत अवस्थेत पडलेला आहे अशा कॉल ६ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ११२ वर आला होता लागलीच उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक पी एम देवकत्ते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देवून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करून खुनातील दोघा आरोपींना एका तासाच्या आत ताब्यात घेतले आहे