गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांना लंम्पी चा प्रादुर्भाव झाला आहे आणी प्रसार होत आहे याकडे जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी चे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना दिले. मा. जिल्हाधिकारी यांनी याकडे तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश संबधितांना दिले तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सुध्दा या बाबतीत लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील असे संबंधीत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांना आदेश दिले आहेत.