पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्याबद्दल आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी आज मणिपूरमध्ये हजारो कोटी रुपयांच्या विकास योजनांचे उद्घाटन करत आहेत. विरोधकांना ते आवडत नाही का?..कधी जायचे, कुठे जायचे आणि कधी जाऊ नये, हे सर्व धोरणात्मक बाबी आहेत. तिथे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याने विरोधकांनी आनंदी असले पाहिजे.