राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने गडचिरोली शहरातील गणेश मंडळांसाठी मूर्ती सजावट आणि देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम बक्षीस 21 हजार रुपये, द्वितीय 15 हजार आणि तृतीय बक्षीस 11 हजार रुपये दिले जाणार आहे.या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविण्याची मुदत 2 सप्टेंबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा होणार आहे.