शहरातील वार्ड क्र.6 येथे घराशेजारील जुन्या विहिरीत एका 70 वर्षीय वृद्धेने दम्याच्या आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेवंताबाई सीताराम शेंडे असे मृतक वृद्धेचे नाव आहे. मृतक वृद्धेचा दम्याचा त्रास वाढला होता. याबाबत मोहल्यातील महिलाना मृतकाने त्रास सहन होत नसल्याचे सांगितले होते .दम्याचा आजाराला कंटाळून वृद्धेने घरा शेजारील विहिरीत आत्महत्या केली. घटनेची माहिती कुही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन तपास कूही पोलीस करित आहेत.