गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली.विशाल मातीबर गौतम (२१, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.